Thursday, January 1, 2026

Fact Check

ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये हिंदू देवी देवतांची नाणी चलनात आणली नव्हती. व्हायरल झाला खोटा दावा

Written By Prathmesh Khunt
Nov 19, 2019
image
Claim
 
Do you know that two anna coin was released in 1818 by East India Company; and you will be surprised to see the other side of the coin.
 
मराठी अनुवाद-
 
तुम्हाला माहित आहे का ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये दोन आण्याचे नाणे तयार केले होते. या नाण्याची दुसरी बाजू पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 
 
 
 
 
 
Verification- 
 
 
अमृत राज नावाच्या ट्विटर हॅंडलवर इंग्रजांच्या काळातील नाण्याचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या नाण्यात ओम आणि कमळाचे चित्र आहे तर दुस-या नाण्यामध्ये प्रभु रामचंद्रांच्या चित्राखाली श्रीराम दरबार लिहिल्याचे दिसून येते. ट्विटमध्ये दावा केला आहे कि ईस्ट इंडिया कंपनी ने 1818 मध्ये हे दोन आण्याचे नाणे चलनात आणले होते. या नाण्याची दुसरी बाजू पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 
 
आम्ही या नाण्यांसंबंधी काही माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी गूगलमध्ये शोध घेतला असता असाचा दावा करणारे आणखी एक ट्विट आढळून आले.
 
 
 
याशिवाय फेसबुकवर ही अशाच प्रकारचे दावे असणा-या पोस्ट पाहण्यास मिळाल्या.
 
 
 
 
याशिवाय या नाण्यांची माहिती सांगणारा फेसबुक वर एक व्हिडिओ ही मिळाला. 
 
 
या नाण्यांविषयी अधिकृत माहिती मिळत नसल्याने आम्ही शोध सुरूच ठेवला असता विकीपीडियाच्या वेबसाईटवर एक लेख आढळून आला. या लेखात ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशांनी भारतात चलनात आणलेल्या नाण्यांसंबंधी माहिती देण्यात आली आहे पण या नाण्यांत कुठेही व्हायरल नाणी आढळून आली नाहीत. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु ठेवला असता आम्हाला बीबीसी मराठी चा लेख मिळाला.
 
 
या लेखात म्हटले आहे की-  ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 17व्या शतकात हिंदूंच्या सन्मानार्थ आपल्या नाण्यांवर भारतीय देवदेवतांच्या चित्रांचा उपयोग केला होता. मात्र हे दावेही नकली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात इंग्लंडमधील ऐशमोलियन संग्रहालयातील नाण्यांचे विशेषज्ञ शैलेंद्र भंडारे यांच्याशी आम्ही बातचीत केली.”आधुनिक तंत्राच्या साह्याने ऐतिहासिक दिसणारी ही नाणी तयार करण्यात आली आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आजही या नाण्यांचा वापर होतो. फकीर आणि साधू अनेकदा ही नाणी वापरतात. गरीब आणि मूलबाळ नसलेल्या लोकांना अशी नाणी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र या नाण्यांना ऐतिहासिक म्हणता येणार नाही,” असं शैलेंद्र यांनी सांगितलं.
 
 
यावरुन स्पष्ट होते की ईस्ट इंडिया कंपनीने हिंदू देव देवतांची चित्रे असलेली नाणी चलनात आणली नव्हती.  सोशल मिडियात फोटोशाॅप्ड इमेजच्या आधारे भ्रामक दावे व्हायरल करण्यात आले आहेत. 
 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search 
  • Google keyword Search
  • Google Reverse Image
  • Facebook Search 
 
 
Result- False
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)
image
જો તમે દાવાની તપાસ કરાવવા માંગતા હોય અથવા ફીડબેક કે ફરિયાદ કરવા માંગતા હોવ, તો અમને વૉટ્સઍપ નંબર +91-9999499044 અથવા ઇમેલ - checkthis@newschecker.in​. પર લેખિતમાં જણાવી શકો છો. તમે અમારો સંપર્ક કરીને ફોર્મ ભરી શકો છો.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

14,935

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage