Chayan Kundu
-

क्रिस्टियानो रोनाल्डोला इराणमध्ये व्यभिचारासाठी 99 फटके मिळणार? व्हायरल दावा खोटा आहे
अनेक सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की इराणने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला व्यभिचाराबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा दिली आहे. दाव्यांनुसार, फुटबॉलपटू त्याची चाहती, चित्रकार आणि दिव्यांग महिला फातिमा हमामी या महिलेसोबत हस्तांदोलन आणि आलिंगन देताना दिसल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
-

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे
खाद्यपदार्थात होणारी भेसळ हा चिंतेचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर बनावट गहू बनविले जात असल्याचे सांगत एका कारखान्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दावा आहे की, प्लास्टिक पासून गहू तयार करून गव्हात भेसळ केली जात आहे.
-

Fact Check: एमपीचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नाही, बनावट पत्र व्हायरल
मध्यप्रदेश निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराज झालेले राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.
-

Fact Check: पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित नाही
पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की “हे दृश्य इस्रायलचे आहे, जिथे हमासचे सैनिक मोटर फिट केलेल्या ग्लायडरमधून उतरले आणि उद्यानांमध्ये उत्सव साजरा करत असलेल्या इस्रायली नागरिकांवर गोळीबार सुरू केला”.
-

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट
लहान मुलांना पिंजऱ्यात ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्याचा संबंध अलीकडच्या इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी जोडला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स दावा करत आहेत की हमासच्या सैनिकांनी इस्रायली मुलांना पकडले आहे, तर काही यूजर्स दावा करत आहेत की ही पॅलेस्टिनी मुले आहेत, ज्यांना इस्रायलने पकडले आहे.
-

गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का?
गृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे.
-

Weekly Wrap: प्रग्यान रोव्हर तोडले, सांप्रदायिक स्टॅम्प, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर विविध फेक दावे करण्यात आले. एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडून धमकीचा संदेश पाठवला आहे, असा दावा करण्यात आला. इंदिरा गांधींनी मुस्लिम पैलवानाने हिंदू पैलवानास मारताना दाखवणारा स्टॅम्प जारी केला होता, असा दावा करण्यात आला. हैदराबादमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघासमोर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या, असा दावा करण्यात आला. राजस्थान सरकारने इक्बालच्या कुटुंबाला…
-

Fact Check: चंद्रावरील प्रग्यान रोव्हर एलियन्सने तोडल्याची चर्चा निराधार आहे
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की एका एलियनने प्रज्ञान रोव्हर तोडले आहे आणि धमकीचा संदेश पाठवला आहे.
-

Fact Check: पाक क्रिकेट संघासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या? नाही, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे
पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावरून बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देताना ऐकू येत आहेत.
-

Weekly Wrap: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्टचेक
सोशल मीडियावर मागील आठवड्यातही फेक क्लेम्सचा पाऊस पडला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, सांप्रदायिक विषय यावर विविध दावे करण्यात आले. कॅनडाच्या राजदूताने परत जाण्यापूर्वी दरबार साहिब येथे नमन केले, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात घराजवळ न थांबवल्याने मुस्लिम जमावाने बस फोडली, असा दावा झाला. पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली, असा…