Prasad Prabhu
-

Weekly Wrap: बलात्कार प्रकरणात सावरकरांना शिक्षा, पाच हजारात अँजिओग्राफी, राणीला द्यावी लागते पेन्शन आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर खोट्या माहितीचा पाऊस पडला. हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला, असा दावा झाला. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून खर्च फक्त ₹5000 आहे, असा दावा करण्यात आला. मार्गारेट लॉरेन्स नामक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1908 मध्ये दोषी ठरल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगवास घडला होता, असा दावा…
-

Fact Check: ‘सत्ता हस्तांतरणाचा करार’ आणि राणी एलिझाबेथच्या पेन्शनबद्दलचा दावा खोटा आहे
सोशल मीडिया युजर्स एक संदेश शेयर करत आहेत, ज्यामध्ये ब्रिटीशांपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या दरम्यानच्या परिस्थितीबद्दल आणि त्या काळात झालेल्या सत्ता हस्तांतरणाच्या कराराबद्दल चर्चा केली जात आहे. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
-

Fact Check: श्रीलंकेतील बौद्ध भिक्खूला मारहाणीचा व्हिडिओ हिंदु संताच्या नावाने व्हायरल
अर्धनग्न अवस्थेत एक पुरुष आणि दोन महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही लोक व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिला आणि पुरुष यांना मारहाण करीत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ देखील बनवत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स दावा करत आहेत की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती एक हिंदू संत आहे ज्याला लोकांनी महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडले आहे.
-

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही, खोटा आहे हा दावा
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित करून वाद निर्माण केले जातात. सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर वादळे उठविण्यात आली. आता त्यांच्या तुरुंगवारीबद्दल वाद निर्माण करणारा एक दावा केला जात आहे.
-

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा
मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या नावे एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा सध्या केला जात आहे. आता हार्ट अटॅक ला घाबरण्याची गरज नाही. या इस्पितळात नवी सीटी अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून येथे फक्त ₹5000 इतकाच खर्च येतो असे हा दावा सांगतो.
-

Weekly Wrap: मणिपूर हिंसाचारात आरएसएस, ढबू मिरचीत साप, स्टार चिन्हाच्या नोटा, मध्यरात्री येणार कॉस्मिक किरण आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
पावसाचा रोज वाढत असताना त्याच प्रमाणात बनावट दाव्याचा पाऊसही सोशल मीडियावर जोरदार पडला. मागील आठवड्यात अनेक दावे करण्यात आले. मणिपूरात महिलांची विवस्त्र धिंड काढणारे आरएसएसशी संबंधित आहेत, असा दावा करण्यात आला. स्टार चिन्ह असलेल्या ₹५०० च्या नोटा बनावट असल्याचा दावा करण्यात आला. ठराविक दिवस न सांगता तुमचे मोबाईल आणि टॅब्लेट्स दूर ठेवा कारण पृथ्वीजवळून मध्यरात्री…
-

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा
नागरिकांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी दाखविणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, हिरव्या मिरचीत जगातील सर्वात लहान विषारी साप आढळून आला असून मिरची आहारात वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
-

Fact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल करीत व्हायरल
मणिपूरमधील नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून निषेध करत आहे आणि हे सर्व काँग्रेसच्या सांगण्यावरून सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत केला जात आहे.
-

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा
सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, प्रत्येकाने आपले मोबाईल दूर किंवा बंद ठेवावे कारण मध्यरात्री कॉस्मिक (वैश्विक) किरण पृथ्वीच्या फार जवळ जाणार आहेत. असे म्हटलेले आहे. हा व्हायरल मेसेज व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक ग्रुपवर मोठ्याप्रमाणात शेअर झाला आहे.
-

Fact Check: नंबर पॅनलमध्ये ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा कायदेशीर आणि वैध
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून * ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत. या नोटा बनावट असून काळजी घ्या असे आवाहन करणारा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात फिरू लागला आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा दावा केला जात असून व्हाट्सअपवरही व्हायरल झाला आहे.