Prasad Prabhu
-

“आगीत तेल टाकणे, एक मूर्खपणाचे कृत्य”: मणिपूर हिंसाचारात दोषी ठरवीत पसरविल्या जाणार्या फेक न्यूजवर मणिपूर भाजप उपाध्यक्षांची प्रतिक्रिया
मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात RSS गणवेशातील दोन पुरुषांची प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे, अनेकांनी असा दावा केला आहे की दोन कुकी महिलांना विवस्त्र करून परेड करणाऱ्या पुरुषांच्या गटात हे दोघेही होते.
-

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
खोटी माहिती, दावे आणि बातम्यांची बरसात मागील आठवड्यातही सोशल मीडियावर सुरूच राहिली. काँग्रेसच्या बैठकीत चोर ग्रुप असे लिहिलेला बॅनर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले असा दावा वाढीव पावसाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला. रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, नव्या भारतात…
-

Fact Check: चोर ग्रुप बैठकीचे बॅनर एडिटेड आहे
‘चोर ग्रुप मीटिंग’ असे बॅनर असलेले काँग्रेसच्या सभेचे छायाचित्र व्हायरल होत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी हे छायाचित्रात दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्स दावा करीत आहेत की कोअर ग्रुप असे लिहिण्याऐवजी चोर ग्रुप झाले. पण एकाही विद्वानाला ही घोडचूक लक्षात…
-

इमर्जन्सी अलर्ट आलाय? काळजीची गरज नाही, हे वाचा
देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी गुरुवार दि. २० जुलै रोजी एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. साधा मेसेज म्हणून काहींनी दुर्लक्ष केले असेल मात्र अनेकजण पॅनिकसुद्धा झाले. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर युजर्सनी या अलर्ट बद्दल भाष्य केले. हा ऑनलाईन फ्रॉड आहे का? अशी चर्चा सुरु झाली. अखेर इतर जागरूक युजर्सनी घाबरू नका…
-

लाटांमध्ये कुटुंब वाहून जात असल्याचे दाखवणारा व्हिडिओ मुंबईच्या बँडस्टँडचा नाही, अधिक तपशील येथे वाचा
अनेक सोशल मीडिया युजर्स मुंबईतील मुसळधार पावसात वांद्रे (Bandra) बँडस्टँडवर दोन जण बुडाल्याचा दावा करत समुद्रकिनाऱ्यावर लाटांनी वाहून गेल्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत.
-

चांद्रयान 3 चे प्रक्षेपण दर्शविण्यासाठी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओंमागील सत्य हे आहे
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम, चांद्रयान 3 चे 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या प्रक्षेपणानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी चांद्रयान 3 च्या उड्डाणाची झलक दाखवण्याचा दावा करणारे एका व्यक्तीने विमानातून घेतलेले व्हिडिओ असे सांगत शेअर केले. न्यूजचेकरने अशा दोन व्हिडिओंची तपासणी केली आणि ते व्हिडीओ…
-

Fact Check: रहदारी नियम उल्लंघनासाठी १०० पेक्षा जास्त दंड नाही? व्हायरल दावा चुकीचा आहे
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड फक्त १०० रुपयेच आहे. पोलिसांना यापेक्षा जास्त दंड घेण्याचा अधिकार नाही. असा दावा सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
-

Fact Check: लोकांनी धक्के देऊन ट्रेन सुरू केली का? फलकनुमा एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लष्कराचे जवान, रेल्वे कर्मचारी आणि सामान्य लोक ट्रेनच्या डब्याला धक्का देताना दिसत आहेत. नव्या भारतामध्ये धक्का देऊन ट्रेन सुरू करावी लागत आहे असा दावा करत व्हिडिओ शेअर केला जात आहे.
-

Weekly Wrap: पेन्शनधारकांचे पैसे, ल्युपो केकमध्ये अर्धांगवाताची टॅबलेट, महिलेने दिला सापाला जन्म आणि इतर प्रमुख फॅक्टचेक
मागील आठवडाही व्हायरल क्लेम्सची बरसात करून गेला. पेन्शनधारकांचे न वापरलेले पैसे परत घेण्याचे आदेश सरकारने बँकांना दिल्याचा दावा करण्यात आला. ल्युपो केक मध्ये टॅब्लेट्स सापडले असून त्याचे सेवन केल्यास मुलांना अर्धांगवात होतो, असा दावा करण्यात आला. एका भारतीय महिलेने सापाला जन्म दिला आहे, असा दावा करण्यात आला. कोल्डड्रींक्स मध्ये इबोला व्हायरस असून ते न पिण्याचा…
-

Fact Check: पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे? खोटा आहे हा दावा
व्हाट्सअपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यावरील पैसे आता बँका सरकारला परत पाठविणार आहेत. कारण तसा आदेश सरकारने बँकांना दिला आहे. असे हा मेसेज सांगतो.