Prasad Prabhu
-

Fact Check: अंबानींनी NMACC कार्यक्रमात टिश्यू पेपर्सऐवजी ₹500 च्या नोटा दिल्या? जाणून घ्या व्हायरल इमेजमागील सत्य
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमातील व्हिज्युअल्सने नेटिझन्सची झोप उडविली. चलनी नोटांनी सजवलेल्या मिठाईच्या प्लेटची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शेअर केली जात आहे. छायाचित्रकार जर्मन लार्किनच्या इंस्टाग्राम स्टोरीतील हे स्क्रीनग्रॅब, “₹500 च्या नोटा” असलेली डिश दाखवते. अनेकांनी ही अतिशयोक्ती पाहून स्मायली दिली, तर इतर अनेकांनी ते चित्र खरे असल्याचे…
-

Weekly Wrap: हृदयविकारावरील रेमेडी, मोदींची श्रीमंत भावंडे, बुर्ज खलिफावर श्रीराम, आंबा खावून पिऊ नका कोल्डड्रिंक तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक खोट्या दाव्यान्नी सुळसुळाट केला. हृदयविकारावरील एक रेमेडी वापरल्यास बायपास, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ची गरज नसल्याचा दावा करण्यात आला. रामनवमीच्या निमित्ताने बुर्ज खलिफावर श्री रामाची प्रतिमा झळकाविण्यात आली असा एक दावा झाला. आंबा खाऊन त्यावर कोल्डड्रिंक पिल्यास मृत्यू होतो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे त्यांची सख्खी व चुलत भावंडे श्रीमंत झाली…
-

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा एक व्हायरल मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. पंतप्रधानांच्या प्रभावामुळे त्यांच्या सख्ख्या आणि चुलत भावंडांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. त्यांना सन्मानाची पदे मिळाली आहेत. तसेच काहींच्या नावावर मोठे उत्पन्न मिळविणारे व्यवसाय आहेत. असे हा दावा सांगतो. “मोदी सरकार मध्ये हिम्मत असेल तर, यांच्यावर ED ची चौकशी…
-

Fact Check: ही रेमेडी केल्यावर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास ची गरज नाही असा दावा वाचनात आलाय? जाणून घ्या सत्य
व्हाट्सअप विद्यापीठातून अनेक आरोग्यविषयक सल्ले आणि मार्गदर्शन दिले जाते हे आपण पाहतोच. काही सल्ल्यांना आगापिछा राहत नाही. तर काही सल्ले विशिष्ट डॉक्टरांचे नाव देऊन दिले जातात. असाच एक सल्ला सध्या मलाया विद्यापीठाच्या डॉ. विकिनेश्वरी यांनी दिला असल्याचे सांगून व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितलेली रेमेडी जर अंमलात आणली तर हृदयरोग्याला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा…
-

Fact Check: आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्यास होतो मृत्यू? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे
फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आणि शीतपेयांच्या सध्या उन्हाळ्यात चलती आहे. याच दरम्यान एक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आपणही आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिणे टाळावे अन्यथा मृत्यूचा सामना करावा लागेल असे हा दावा सांगतो आहे.
-

Fact Check: बुर्ज खलिफा प्रभू रामाच्या प्रतिमेने उजळला? नाही, व्हायरल फोटो एडिटेड आहे
दुबईच्या प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित होत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 30 मार्च 2023 रोजी असलेल्या रामनवमीच्या निमित्ताने लाइट शो करण्यात आल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे.
-

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक
गेल्या आठवड्यात खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरविणारे दावे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदार पदावरून अपात्र ठरविले गेल्यानंतर त्यांनीच अपात्रता विरोधी विधेयक फाडले होते. असा दावा करण्यात आला. राहुल गांधींनी सावरकरांच्या नातवाच्या इशाऱ्यानंतर त्यांच्याबद्दलचे सर्व ट्विट्स रद्द केले असाही दावा झाला. गोवा राज्यात बनावट काजू तयार केले जातात असे सांगत…
-

डीपीएस गोवा ने बिकिनीला शालेय गणवेश म्हणून मान्यता दिली असे सांगत व्हायरल ग्राफिक खरे आहे?
DPS गोवा ने उन्हाळ्यात मुलींसाठी शाळेचा गणवेश म्हणून बिकिनीला परवानगी दिली आहे.
-

Fact Check: तिरुपती तिरुमला मंदिराच्या ट्रस्टीच्या घरावर पडला आयटीचा छापा? काय आहे व्हायरल दाव्याचे सत्य
सोशल मीडियावर एक व्यक्तीचा फोटो वापरून एक दावा केला जात आहे की तिरुपती तिरुमला मंदिराच्या विश्वस्थांवर आयटी विभागाचा छापा पडला आहे. हा दावा मागील दोन वर्षांपासून केला जात असून सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून पुढे आला आहे.
-

Fact Check: 1 एप्रिलपासून लोकांना ₹2000 रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंटवर 1.1% फी भरावी लागणार का? येथे वाचा व्हायरल दाव्याचे सत्य
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की 1 एप्रिलपासून सामान्य लोकांना 2000 पेक्षा जास्त UPI पेमेंट करण्यासाठी 1.1% शुल्क भरावे लागेल. ‘गुगल पे’, ‘पेटीएम’सारख्या डिजिटल माध्यमांच्या मदतीने दोन हजारांहून अधिक यूपीआय पेमेंट केल्यास वाढीव शुल्क लागू शकते, असे सांगितले जात आहे.