Prasad Prabhu
-

अरविंद केजरीवाल यांचा धनुष्य-बाण उलटा धरलेला हा फोटो बनावट आहे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून,त्याद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे.चित्र दसरा कार्यक्रमासारखे दिसते,ज्यात केजरीवाल धनुष्यबाण उलटे धरलेले दिसत आहेत.केजरीवाल यांना धनुष्यबाण नीट कसा धरायचा हे देखील कळत नाही असा टोला मारत लोक लिहित आहेत.हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे.
-

भारत जोडो यात्रेनंतर लोकप्रियतेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मात दिली का?ही पोस्ट दिशाभूल करणारी
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) ७ सप्टेंबरला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत आहेत.हे पाहता भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची (Rahul Gandhi) लोकप्रियता पंतप्रधान मोदींपेक्षा (Narendra Modi) जास्त झाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.आजतक वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून हा दावा करण्यात…
-

नामिबियातून भारतात आलेल्या चित्त्याने एका व्यक्तीवर हल्ला केला? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
17 सप्टेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना केंद्रीभूत ठेऊन अनेक वाद वाढत चालले आहेत. सोशल मीडियावर नामिबियाच्या चित्त्यांच्या नावाने अनेक दावे शेअर केले जात आहेत. Newschecker द्वारे या दाव्यांची तपासणी येथे वाचली जाऊ शकते. नामिबियातील चित्ता म्हणून शेअर केलेल्या या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी, आम्हाला त्याची एक की-फ्रेम Google वर सापडली.…
-

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत पाकिस्तानचा झेंडा? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या 3750 किमी लांबीच्या भारत जोडो यात्रेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोक झेंडा घेऊन पदयात्रा काढत आहेत. काँग्रेस पक्षावर निशाणा साधत अनेक सोशल मीडिया यूजर्स दावा करत आहेत की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे.
-

राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीत सचिन पायलटच्या समर्थकांनी संपादित छायाचित्र शेअर केले, राहुल गांधींना हटवले आणि घातले पायलटचे रेखाचित्र
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी लिहिले आहे.) राजस्थान काँग्रेसमधील गदारोळात एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक मुलगी भारत दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना फोटो देताना दिसत आहे, ज्यामध्ये काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे स्केच बनवले आहे. आता हा फोटो शेअर करत पायलट समर्थक दावा करत आहेत की भारत…
-

व्हायरल झालेला व्हिडिओ ही खरी घटना नसून स्क्रिप्टेड ड्रामा आहे
एका शाळकरी मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी बसस्टॉपवरून पळवून नेल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन तरुणांनी अंमली पदार्थांचा वास देऊन तिच्याशी ‘गैर कृत्य’ करण्यासाठी तिला पळवले होते.