Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत सचिनच्या मागे भिंतीवर मुकेश आणि नीता अंबानी यांचा फोटो दिसत आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा फोटो पंतप्रधान कार्यालयात आहे असा दावा युजर्स करत आहेत.


सचिनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कधी भेट घेतली आणि पंतप्रधान कार्यालयात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा फोटो लावण्यात आला आहे याची पडताळणी करण्यास आम्ही सुरुवात केली. व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला अनेक वेबसाईट्सवर मुळ फोटो आढळून आला. तसेच Business Standard च्या वेबसाईटवर 19 मे 2017 रोजीच्या एका न्यूज रिपोर्टमध्ये हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ‘सचिन एक बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटाविषयी त्याने पंतप्रधानांची भेट घेतल्याची माहिती यात देण्यात आली आहे.

याशिवाय Express sports च्या ट्विटर हॅंडलवर देखील आम्हाला हा फोटो आढळून आला यात म्हटले आहे की संचिन तेंडुलकर आपल्या चित्रपटा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेला होता.
Narendramodi.in या वेबसाईटवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे फोटो अपलोड करण्यात आले होते.

Express sports
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
June 25, 2024
Komal Singh
June 14, 2024
Komal Singh
May 16, 2024