Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात काही मुले रात्रीच्यावेळी वाढदिवस साजरा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही मुले आपल्या मित्राचा वाढदिवस खूपच विचित्र पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत. मित्रांच्या या कृत्यामुळे बर्थडे बाॅय बेशुद्ध होतो व त्याला मित्र दवाखान्यात नेण्यात येत असल्याचे दिसते. दावा करण्यात येत आहे की, मित्रांच्या अनोख्या फंड्यामुळे बर्थडे बाॅयचा जीव गेला.


हा दावा फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

युटयूबवर देखील व्हिडिओ आढळून आला .
व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सरु केली. मात्र या व्हिडिओबाबतची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांत आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही व्हडिओ बारकाईने पाहिला असता व्हिडिओच्या शेवटी अशा विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय व्हिडिओच्या शेवटी म्हटले आहे की, व्हिडीओ बघितल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओतील दृश्ये बघून असे कृत्य करु नका. हा व्हिडीओ केवळ लोकामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बनविण्यात आला आहे.

यावरुन असे दिसते की, व्हायरल दावा खरा नाही .हा व्हिडिओ केवल जागृती निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे आहे.
अधिक माहितीसाठी आम्ही व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे शोधण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला असता Hamsa Nandini या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्याच आल्याचे आढळून आले. पोस्टमध्ये म्हटले आहे की, असे साजरे करू नका. बघितल्याबद्दल धन्यवाद! कृपया लक्षात ठेवा की या पेजवरस्क्रिप्टेड ड्रामा आणि विडंबन देखील आहे. हे लघुपट फक्त शैक्षणिक उद्देशाने आहेत!
आम्हाला या पेजवर अशाच प्रकारचे जागृतीपर इतर व्हिडिओ आढळून आले.

अशाप्रकारे आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल होत व्हिडिओ खर नाही तर जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नि4माण करण्यात आलेला आहे.
YouTube
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
July 8, 2023
Ishwarachandra B G
June 27, 2023
Vasudha Beri
June 13, 2023