Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात आला आहे की, ठाकरे सरकारने रात्री एकट्या महिलांना घरी पोहचण्यासाठी विनामुल्य राईड उपलब्ध करुन दिली आहे. ही सेवा रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल.

फेसबुक पोस्ट इथे पहा



आम्ही Google वर “1091 आणि 7837018555” या किवर्डने शोध घेतला असाता आणि The Tribune च्या वेबसाईटवर 2 डिसेंबर 2019 रोजीचा रिपोर्ट आढळून आला. ज्यामध्ये लुधियानाचे पोलीस आयुक्त राकेश अग्रवाल यांनी म्हटले आहे की,, “आम्ही महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लुधियाना मध्ये अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. . आमच्याकडे महिलांसाठी 1091 आणि 7837018555 हे दोन समर्पित हेल्पलाइन क्रमांक आहेत. हे 24×7 चालू आहेत आहेत. लुधियानामध्ये घरापर्यंत मोफत राइड मिळवण्यासाठी महिला हे नंबर डायल करू शकतात.”
याशिवाय एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की लुधियाना पोलिस, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कॅब शोधू शकत नसलेल्या महिलांना विनामूल्य राइड ऑफर करत आहे. लुधियाना पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर दोन्ही क्रमांकांचा महिला हेल्पलाइन म्हणून उल्लेख आहे.
5 डिसेंबर रोजी पंजाब पोलिसांनी ट्विटमध्ये Times of India चा एक लेख शेअर केला ज्यामध्ये म्हटले आहे की, “महिला हेल्पलाइन क्रमांकावर 3000 हून अधिक कॉल आले आहेत. महिला रात्री घरी सोडण्याच्या सुविधांबद्दल चौकशी करत आहेत. हे कॉल फक्त शहरातील रहिवाशांचे नव्हते तर पंजाबच्या बाहेरूनही आले होते.”
ministry of communication and information technology च्या 2016 च्या अधिसूचनेने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एसएमएस-आधारित सेवेसाठी ‘1091’ (महिला हेल्पलाइन) वितरीत केले. मात्र, त्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी झालेली नाही. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या NARI (वेबसाइटवर काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला हेल्पलाइन नंबरची यादी आढळली. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगढ यासारख्या अनेक राज्यांमध्ये ‘1091’ वैध नाही. अंदमान आणि निकोबारच्या केंद्रशासित प्रदेशातही ते सुरु नाही.
महाराष्ट्र पोलिसांनी खरंच असा उपक्रम सुरु केला आहे का याचा अधिक शोध घेण्यासाठी आम्ही गूगल सर्चचा आधार घेतला पण आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. शिवाय महाराष्ट्र पोलिसांचे असे कोणतेही ट्विट आढळून आले नाही. मात्र 4 डिसेंबर 2019 रोजीची नागपुर पोलिसांची एक बातमी न्यूज 18 या वेबसाईटवर आढळली ज्यात म्हटले आहे की, नागपुर पोलिसांनी गरजवंत महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत विनाशुल्क राईड सुरु केली आहे.

याशिवाय नागपुर पोलिसांचे ट्विट देखील आढळून आले यात म्हटले आहे की, 100 किंवा 1091 किंवा 07122561103 हा हेल्पलाईन नंबर डायल करुन महिला या सेवेचा वापर करु शकतात.
अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महाराष्ट्र पोलिसांनी 7837018555 ही हेल्पलाईन महिलासांठी सुरु केलेली नाही तर पंजाबमधील लुधियाना पोलिसांचा हेल्पलाईन नंबर चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात होत आहे.
The Tribune: https://www.tribuneindia.com/news/archive/ludhiana/now-free-ride-to-home-for-women-stuck-in-869017
Nagpur police tweet- https://twitter.com/NagpurPolice/status/1202135205701488640
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
February 24, 2024
Prasad Prabhu
February 21, 2024
Prasad Prabhu
January 25, 2024