Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
नटराज पेन्सिल पॅकिंग जॉब ऑफर करत असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर फिरत आहेत.
“नटराज पेन्सिल पॅकिंग जॉब, घरून काम. अर्धवेळ नोकरी. दरमहा 30000 पगार. कामासाठी स्त्री-पुरुषांची तातडीची गरज. माझा संपर्क क्रमांक आणि व्हॉट्सअप नंबर.” असे या पोस्ट मध्ये सांगितले जात आहे. अनेक पोस्टमध्ये संपर्क क्रमांक म्हणून वेगवेगळे क्रमांक दिलेले आहेत.

याच प्रकारच्या अनेक पोस्ट आम्हाला आढळल्या. फेसबुक वरील ग्रुप्सवर याप्रकारे पोस्ट टाकण्यात आल्या आहेत. अनेक पोस्ट हिंदी भाषेतही आहेत.




सर्वात अलीकडील काही पोस्ट येथे, येथे आणि येथे वाचल्या जाऊ शकतात.
प्रथम आम्ही “नटराज पेन्सिल, पॅकिंग जॉब ऑफर” हा कीवर्ड शोधला. आम्हाला जागरण डॉट कॉम वर प्रकाशित झालेली एक बातमी मिळाली.

या बातमीत गार्गी नामक युवतीची कशी फसवणूक झाली आहे, ते लिहिले आहे. घरबसल्या जॉब आणि तीस हजार रुपये पगाराची संधी. अशी जाहिरात गार्गी ने फेसबुक वर पाहिली. या जाहिरातीची एक संपर्क क्रमांक होता. घरबसल्या काम असल्याने तातडीने तिने संपर्क केला असता तिला पेन्सिल पॅकेजिंग चे काम आहे. ते आपण घरबसल्या करायचे असून माल आपल्या घरीच पाठविला जातो. अशी माहिती पलीकडील व्यक्तीने दिली. माल घेऊन येण्यासाठी सर्वप्रथम तिच्याकडून ६५० रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्याची मागणी करण्यात आली. पुढे जागरण च्या बातमीत असे लिहिले आहे की, तिने ते करताच कागदपत्रे आणि इतर कार्यवाहीसाठी आणखी ११५० रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. विश्वास बसण्यासाठी गार्गी हिला पलीकडील व्यक्तीने ID कार्ड पाठवून दिले. त्यामुळे तिने लागलीच ती रक्कमही पाठविली. त्यानंतर काही वेळाने आपल्या कंपनीचा माणूस तुमच्या घरापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर असून त्याच्याशी बोला आणि पत्ता सांगा असे सांगण्यात आले. गार्गीने त्याला फोन केला असता आपले लोकेशन सापडत नाही, मी माल घेऊन उभा आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले.
त्यानंतर ही बातमी सांगते की, त्या व्यक्तीने ४१४९ रुपये पाठविल्यास आपण माल घेऊन येऊ असे सांगताच तिने पुन्हा पैसे पाठविले मात्र आणखी ३१५० रुपये पाठविण्याची सूचना करण्यात आली. हे पैसे पाठविल्यानंतर फोन घेणे बंद झाले. आपण पुरते फसले गेल्याचे गार्गी च्या निदर्शनास आले. जागरण च्या बातमीतून अशी माहिती मिळताच हा प्रकार पूर्णपणे फसवणुकीचा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
मग आम्ही नटराज पेन्सिल बनवणाऱ्या हिंदुस्तान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट पाहिली. कंपनीच्या नावाने रोजगार फसवणूक सुरु असल्याचा इशारा देणारा व्हिडिओ वेबसाइटवर मिळाला.

कंपनीमध्ये उत्पादन आणि पॅकिंग पूर्णपणे मशीनच्या साहाय्याने होत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, कंपनीने कोणत्याही नोकरीच्या संधी दिलेल्या नसून खोट्या नोकरीच्या आमिषांना बळी पडू नका असा इशारा देण्यात आला आहे.
नटराज पेन्सिल कंपनीच्या जॉब ऑफर्स देणाऱ्या जाहिराती स्कॅम चा भाग असल्याचे आमच्या तपासात उघड झाले आहे. नोकऱ्या देण्याची आमिषे दाखविणाऱ्या पोस्ट चुकीच्या आणि दिशाभूल करून लूट करणाऱ्या असल्याचे कंपनीनेच म्हटले आहे.
Sources
Video posted in the website of Hindustan Pencils
News published by Jagaran.com
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Runjay Kumar
April 12, 2024
Prasad Prabhu
March 27, 2024
Komal Singh
January 24, 2024