Saturday, February 21, 2026

Fact Check

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात रितिक रोशन सहभागी झाल्याचा दावा व्हायरल, हे आहे सत्य

Written By Yash Kshirsagar
Dec 8, 2020
banner_image

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात रितिक रोशन सहभागी झाल्याचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषि कायद्याविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषीमंत्री नरेंद्र तोमर व इतर नेत्यांशी वारंवार बैठक घेतली. मात्र चर्चा निष्फळ झाल्याने देशव्यापी संप करण्यात आला आहे. अशातच दिल्लीतीच्या सीमेवर सुरु असलेल्या या आंदोलनात बाॅलीवुड अभिनेता रितिक रोशन सहभागी झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

ट्विटर / संग्रहित

Fact check / Verification

रितिक रोशन ने खरंच दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात भाग घेतला आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला असता 6 जानेवारी 2018 चा एक यूट्यूब व्हिडिओ सापडला ज्यातील व्हिज्युअल व्हायरल फोटोशी मिळते जुळते होते. 6 जानेवारी 2018 रोजी Bollywood Spy यूट्यूब पेजवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन वडील राकेश रोशन यांच्यासह एका कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहे. व्हिडिओच्या शीर्षकात ‘Hrithik Roshan ATTENDS Celebrations Of Guru Gobind Singh Birth Anniversary’ असले लिहिले आहे. युट्यूब व्हिडिओची फ्रेम देखील व्हायरल फोटोसारखी आहे.

याशिवाय आम्हाला या संबधीचे रितिक रोशन आणि राकेश रोशन यांनी गुरु गोविंद सिंह यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे ट्विट देखील आढळून आले ज्यात आताच्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल होत असलेला फोटो देखील आहे.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, रितिक रोशनचा एका कार्यक्रमातील तीन वर्षांपूर्वीचा फोटो आत्ताच्या शेतकरी आंदोलनाला समर्थन दिल्याच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.

Result -Misleading

Our sources

बाॅलीवुड स्पाय- https://www.youtube.com/watch?v=fd3uBwZDRvA

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

14,935

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage