Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, हा पीएम मोदींनी वाराणसीमध्ये नुकत्याच केलेल्या रोड शोचा व्हिडिओ आहे. आता ईव्हीएमचा बहाणा चालणार नाही, असा टोलाही लोकांनी गर्दीच्या नावाखाली घेत लिहिले आहे.
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, फेसबुकवर एका वापरकर्त्याने लिहिले की,“मोदी जी का भौकाल बाद में मत कहना EVM हैक थी”.

व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, फेसबुकवर आणखी एका युजरने लिहिले की, “मोदी जी का भौकाल बाद में मत कहना EVM हैक थी ई हव राजा बनारस।”

यूपी विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये तीन किलोमीटर लांबीचा रोड शो केला. यादरम्यान त्यांचा रोड शो मालदहिया चौकातून काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये पोहोचला. पीएम मोदींशिवाय सपा प्रमुख अखिलेश यादव आणि यूपी काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनीही वाराणसीमध्ये रोड शो केला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, हा पीएम मोदींनी वाराणसीमध्ये नुकत्याच केलेल्या रोड शोचा व्हिडिओ आहे.
हा मोदींनी वाराणसीमध्ये नुकत्याच केलेल्या रोड शोचा व्हिडिओ आहे का? याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर ‘मोदी जी का भौकाल बाद में मत कहना’ हा कीवर्ड टाकून फेसबुकवर शोध सुरू केला. दरम्यान, आम्हाला 25 एप्रिल 2019 रोजी ‘ई हवा राजा बनारस’ नावाच्या फेसबुक पेजद्वारे अपलोड केलेला व्हिडिओ प्राप्त झाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये म्हटले आहे की, ““मोदी जी का भौकाल बाद में मत कहना EVM हैक थी.” फेसबुक पेजवर अपलोड केलेला व्हिडिओ आणि व्हायरल झालेला व्हिडिओ दोन्ही एकच आहेत.

तपासादरम्यान आम्हाला 25 एप्रिल 2019 रोजी संसद टीव्हीने अपलोड केलेला रोड शोचा व्हिडिओ सापडला. व्हिडिओनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल 2019 रोजी वाराणसी, यूपीमधील बनारस हिंदू विद्यापीठ ते दशाश्वमेध घाट असा रोड शो केला आणि 26 एप्रिल 2019 रोजी वाराणसीमधून उमेदवारी दाखल केली. संसद टीव्हीने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये मोदींचा रोड शो 50 मिनिटे 40 सेकंदादरम्यान दिसत आहे.
याशिवाय Zee News आणि News 18 सारख्या माध्यम संस्थांनी 25 एप्रिल 2019 रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या रोड शोचा व्हिडिओ ठळकपणे दाखवला.
अशा प्रकारे, आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, वाराणसीमध्ये 25 एप्रिल 2019 रोजी पीएम मोदींनी केलेल्या रोड शोचा व्हिडिओ भ्रामक दावा करून शेअर केला जात आहे. या व्हिडिओचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.
Facebook Page ‘ई हवा राजा बनारस
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
June 25, 2024
Prasad Prabhu
June 15, 2024
Vasudha Beri
June 10, 2024