Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
दावा- रतन टाटांनी 18 वर्षीय तरुणाच्या जेनेरिक फार्मसी स्टार्ट-अपमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली.
मराठमोळा 18 वर्षीय युवक अर्जुन देशपांडे याने सुरु केलेल्या जेनेरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केल्याच्या बातम्या व पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या आहेत.
पडताळणी– आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला याबाबत अनेक बातम्या आढळून आल्या. यामध्ये रतन टाटा यांनी जेनरिक आधार या फार्मसीमध्ये 50 टक्के भागीदारी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

न्यूज18 लोकमत, थोडक्यात न्यूज पोर्टल आदींसह अनेक वेबसाईट आणि वाहिन्यांवर रतन टाटांनी 18 वर्षीय युवा उद्योजक अर्जुन देशपांडे याच्या जेनरिक आधारमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
याशिवाय फेसबुक देखील मोठ्या प्रमाणात हाच दावा व्हायरल होत आहे.


अर्जुन देशपांडे याने याबाबत नेमकी काय माहिती दिली आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासंदर्भात पडताळणी केली असता एबीपी माझा वृत्तवाहिनीला त्याने दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ यूट्यूबवर आढळून आला. मात्र त्याने यामध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले आहे मात्र नेमकी किती गुंतवणूक केली याची माहिती दिलेली नाही. त्या रतन टाटानी किती गुंतवणूक केली आहे हे उघड करता येणार नाही असे त्याने या मुलाखतीत सांगितले आहे.
अर्जुन देशपांडे यांच्या ट्विटमध्ये ही रतन टाटांच्या 50 टक्के भागीदारीचा उल्लेख नाही.
याशिवाय आम्हाला याबाबत खुलासा करणारे रतन टाटा यांचे ट्विट देखील आढळून आले. यात त्यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. मी त्याच्या स्टार्ट-अपमध्ये छोटीशी टोकन रक्कम गुंतवली आहे. त्याला मदत केल्याचा मला आनंद आहे असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की रतन टाटा यांनी 18 वर्षीय युवा उद्योजक अर्जुन देशपांडे याच्या जेनरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये थोडी गुंतवणूक केली आहे. 50 टक्के भागीदारी खरेदी केलेली नाही. माध्यमामंध्ये चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
Source
Facebook, Twitter, Google
Result- Misleading/ Partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Prasad Prabhu
November 4, 2023
Runjay Kumar
October 31, 2023
Yash Kshirsagar
April 13, 2020