Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर एनडीटीव्ही इंडियाचे पत्रकार रवीश कुमार यांनी बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका यांच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, या क्रूर अपघातानंतरही पत्रकार रवीश कुमार प्रश्न करत आहेत की जनरल बिपिन रावत यांची पत्नी हेलिकॉप्टरमध्ये कोणत्या अधिकाराने बसल्या होत्या.

फेसबुक पोस्ट इथे पहा.


फेसबुक पोस्ट इथे पहा.
वरील दावा ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.
CNN.COM ने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमधील किन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले CDS बिपिन रावत यांच्यासह 13 लोकांचा मृत्यू झाला होता. अहवालानुसार, जनरल बिपिन रावत यांची 2019 मध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली. याआधी बिपिन रावत हे ३ वर्षे भारतीय लष्कराचे प्रमुख होते.
8 डिसेंबर 2021 रोजी india.com ने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, जनरल रावत हे 2016 च्या सर्जिकल स्ट्राईक प्लॅनिंगचा देखील भाग होते.
NDTV पत्रकार रवीश कुमार यांनी तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर अपघातात बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिकाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे का याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही रवीश कुमार यांच्या फेसबुक पेजला भेट दिली. यादरम्यान त्यांनी पोस्ट केलेली एक फेसबुक पोस्ट आढळली, ज्यामध्ये त्यांनी या दुर्घटनेचा उल्लेख केला होता. मात्र त्यांनी बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीबद्दल प्रश्न विचारलेला नाही.
यानंतर आम्ही पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबुक पोस्टची एडिट हिस्ट्री तपासली, कारण रवीश कुमारांने हे लिहून नंतर एडिट केले असण्याची शक्यता होती, पण आम्हाला एडिट हिस्ट्रीमध्ये असे काहीही आढळले नाही.

यानंतर आम्ही एनडीटीव्ही इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर पत्रकार रवीश कुमार यांच्या प्राइम टाइम शोचा व्हिडिओ पाहिला, परंतु रवीश कुमार यांनी हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या उपस्थितीवर कुठेही प्रश्न केलेला नाही.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पत्रकार रवीश कुमार यांनी बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिकाच्या हेलिकॉप्टरमधील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता, या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही रवीश कुमार यांच्याशी संपर्क साधला. यादरम्यान रवीश कुमार यांनी सांगितले की, मी असे कुठेही लिहिलेले नाही. कुठेही बोललो नाही. ज्यांनी ही अफवा पसरवली ते जमावाला भडकवत आहेत. या सर्व गोष्टींमुळे माझा जीव सतत धोक्यात येतो. ही अफवा खूप पसरली आहे. मी हे कुठे लिहिलंय हे लोकांनी विचारावं. लोक याचा विचार न करता फॉरवर्ड करत आहेत. मी कालच फेसबुकवर याबद्दल खुलासा केला आहे.
अशा प्रकारे आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की पत्रकार रवीश कुमार यांनी हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका यांच्या उपस्थितीबद्दल शंका घेतली नव्हती. शेअर केला जात असलेला हा दावा खोटा आहे.
Direct Contact
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Komal Singh
June 18, 2024
Komal Singh
December 6, 2023
Prasad Prabhu
November 4, 2023