Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार च्या नावाखाली शेअर केल्या जात असलेल्या या दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही Google वर ‘मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका’ हा कीवर्ड शोधला. या प्रक्रियेत आम्हाला असा कोणताही मीडिया रिपोर्ट प्राप्त झाला नाही, जो व्हायरल दाव्याची पुष्टी करू शकेल.

यानंतर व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचे निष्पक्ष संत म्हणून वर्णन केले जात आहे ती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेत, आम्हाला माहिती मिळाली की व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे नाव पंडित विजय कुमार शर्मा आहे, ज्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर स्वतःला काँग्रेसचे प्रवक्ते असल्याचे म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, आम्ही विविध न्यायालयांमधून लाइव्ह रिपोर्टिंग देण्यासाठी प्रसिद्ध बार & बेंच आणि लाइव्ह लॉ ची X पेजिस शोधली. या प्रक्रियेतही आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही ज्यामुळे व्हायरल दाव्याला बळ मिळेल.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यानंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल या तिन्ही नेत्यांनी पराभव स्वीकारला आणि नवीन सरकारचे अभिनंदन केले.
व्हायरल दावा शेयर करणाऱ्या फेसबुक पेजची चौकशी केल्यानंतर आम्हाला आढळले की पेजद्वारे शेअर केलेल्या बहुतांश पोस्ट एकतर दिशाभूल करणाऱ्या आहेत किंवा त्यात अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी आहेत.
त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फेरनिवडणुकीच्या नावाखाली केला जात असलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. वास्तविक निवडणूक आयोगाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
Our Sources
Election Commission of India
Media reports
Tweets shared by Ashok Gehlot, Kamal Nath and Bhupesh Singh Baghel
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
December 9, 2023
Saurabh Pandey
October 18, 2023