Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मागील आठवडासुद्धा सोशल मीडियावरील विविध व्हायरल दाव्यान्नी चर्चेत राहिला. नाशिक येथून गायब झालेली तरुणी अश्विनी सोनावणेबद्दलचे दावे मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा एक फोटो शेयर करून फोटोमध्ये दिसणारी महिला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून अनेक दावे करण्यात आला. एका मुलीवर हिंसा होत असल्याचा व्हिडीओ मणिपूर हिंसाचाराशी जोडून व्हायरल झाला. वाराणसी येथे दलित मुलीने सहा मुस्लिमांची हत्या केली, असा दावा झाला. बालासोर येथील रेल्वे अपघाताला जबाबदार असलेल्या स्टेशन मास्टर शरीफ याला पश्चिम बंगाल येथील एका मदरशातून पकडले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

नाशिक येथून अश्विनी देविदास सोनावणे ही मुलगी अचानक बेपत्ता झाली असून तिच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत त्याच्यासोबत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि माजी पत्रकार सुप्रिया श्रीनेत असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

व्हिडिओ मणिपूरमधील कुकी ख्रिश्चन मुलीवर झालेल्या हल्ल्याचा आहे, असे सांगत एक दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.

वाराणसीमध्ये एका दलित हिंदू मुलीने बलात्कार आणि धर्मांतराची धमकी देणाऱ्या 6 मुस्लिम तरुणांचा गळा चिरून पलायन केल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

विरोधी पक्षाची नेते मंडळी शरद पवाराच्या दिल्ली येथील घरी मोदीच्या विरोधात कीती खालच्या पातळीवर गेलेली आहे, असे सांगत एक संवाद असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उजेडात आले.

बालासोर रेल्वे अपघातास जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ पश्चिम बंगालच्या मदरशात लपला होता, त्याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आला.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Tanujit Das
April 29, 2024
Arjun Deodia
May 5, 2023
Prasad Prabhu
July 24, 2023