Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
खोटी माहिती, दावे आणि बातम्यांची बरसात मागील आठवड्यातही सोशल मीडियावर सुरूच राहिली. काँग्रेसच्या बैठकीत चोर ग्रुप असे लिहिलेला बॅनर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले असा दावा वाढीव पावसाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला. रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, नव्या भारतात रेल्वेला धक्का मारून सुरु करावे लागत आहे. असे दावे करण्यात आले. चांद्रयान-३ च्या उड्डाणाचे विमानातून चित्रित केलेले व्हिडीओ म्हणून दावे व्हायरल झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

लष्कराचे जवान, प्रवासी आदींनी धक्का देऊन ट्रेन सुरू केली, त्यानंतर ट्रेन पुढे सरकली. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

वांद्रे बॅंडस्टँड येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला. असा दावा करण्यात आला. आम्ही केलेल्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

विमानातील प्रवाशांनी रेकॉर्ड केलेले चांद्रयान 3 चे प्रक्षेपण दर्शविणारे व्हिडिओ असे सांगत दावे करण्यात आले. आमच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे निदर्शनास आले.

काँग्रेसच्या बैठकीत बॅनरवर कोअर ग्रुप ऐवजी चोर ग्रुप असे लिहिण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात व्हायरल फोटो खरा नसल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
June 29, 2024
Prasad Prabhu
June 15, 2024
Prasad Prabhu
June 8, 2024