Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात सध्या काॅंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील बॅनरमुळे सोशल मीडियावर युजर्स उलट सुलट प्रतिक्रिया देत आहेत. या बैठकीत सोनिया गांधी मनमोहन सिंह, राहुल गांधींसह अतर अनेक नेत दिसत आहेत मात्र त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत आहे.
काही युजर्सनी एव्हढी मोठी चूक काॅंग्रेस नेत्यांच्या कशी लक्षात आली नाही असा सवालही उपस्थित केला आहे.



काॅंग्रेसच्या बैठकीत खरंच चोर ग्रुप मिटिग असे लिहिलेला बॅनर लावण्यात आला होता का याची पडताळणी आम्ही सुरु केली. यासाठी गुगल रिव्हर्स अमेज आणि काही किवर्ड्सच्या साहाय्याने शोध सुरु केला असता आम्हाला wionews या वेबसाईटवर एका लेखात हा फोटो आढळून आला या फोटोत कुठेही ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले आढळून आले नाही पण तो फाइल फोटो असल्याचा यात उल्लेख करण्यात आला आहे.

हा फोटो जुना असल्याने नेमका कधीचा आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध पुढे सुरुच ठेवला असता झी न्यूज ची 10 आॅगस्ट 2019 रोजी बातमी आढळून आली ज्यात हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या बातमीत म्हटले आहे की, लवकरच काँग्रेस पक्षात नवा प्रमुख मिळू शकतो. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शनिवारी होणार आहे. सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल. सभेचा मुख्य अजेंडा काँग्रेस अध्यक्ष निवडणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CWC बैठकीत काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष निवडले जाऊ शकतात.

वरील दोन्ही फोटोतील बॅनरवर core (कोअर) किंवा chor ( चोर) ग्रुप मिटिंग असा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा अर्थ व्हायरल फोटो एडिटेड आहे. दोन्हीतील फरक आपण खाली पाहू शकता.

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, काॅंग्रेसच्या बैठकीतील बॅनरवर ‘Chor Group Meeting’ असे इंग्रजीत लिहिलेले नव्हते. मूळ फोटो एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Ishwarachandra B G
June 27, 2024
Vasudha Beri
June 26, 2024
Prasad Prabhu
June 25, 2024